पिंपरी : नेहरूनगर येथील आंबेडकर वसाहतील झोपडपट्टीवासियांनी सर्वोच्च न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय पुणे, एस आर ए चे ट्रायब्युनल कोर्ट येथे दाखल केलेल्या याचिका प्रलंबित असताना एस आर एच एस सी ओ श्री निंबाळकर यांनी २२ सप्टेंबर २०२२ रोजी या सर्व झोपडपट्टीवासियांना नोटीसा देऊन २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत तुमची घरे खाली करा अन्यथा आम्ही बुलडोझर लावून आपले घरे खाली करू यामध्ये होणाऱ्या नुकसानी बाबत आम्ही जबाबदार राहणार नाही. अशा आशयाची नोटीस दिली आहे. याबाबत पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याबरोबर काल रात्री एक बैठक होऊन उद्याची होणारी कारवाई ही बेकायदेशीर असून न्यायालयाचा अवमान करणारी आहे त्यामुळे आपण या कारवाई सहभागी होऊ नये अन्यथा हा न्यायालयाचा अवमान होईल. अशी भूमिका सर्व झोपडपट्टीवासियांनी पोलीस प्रशासनासमोर घेतली. अशाप्रकारे कारवाई झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू प्रसंगी आत्मदहन करू अशा आशयाचं निवेदन रात्री १२.३० वा. पोलिसांना देण्यात आले. यावेळी उमेश बनसोडे प्रा. बी एल शिंदे, मारुती भापकर, दयानंद कोटमाळे, सुरेखा खरात आदि उपस्थित होते.
न्यायालयाचा आदेश डावलून नेहरूनगर येथील आंबेडकर वसाहत पाडणार?
Reviewed by ANN news network
on
९/२३/२०२२ ०१:१२:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/२३/२०२२ ०१:१२:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: