गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२
उत्सव काळात महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करा : आमदार लांडगे यांची मागणी
उत्सव काळात महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करा
आमदार लांडगे यांची मागणी
पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिक, महिलांच्या सुरक्षेबाबत आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला असून, पोलीस प्रशासनाने सण- उत्सव काळातील कायदा- सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात अशी मागणी केली आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकूश शिंदे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की,गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी असे उत्सव होणार आहेत. परिणामी, प्रमुख बाजारपेठा, वर्दळीचे चौक, सार्वजनिक कार्यक्रमांची ठिकाणी महिलांसह अबालवृद्धांची मोठी गर्दी असते. त्यादृष्टीने सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची आश्यकता आहे.
सध्यस्थितीला गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पोलीसांनी उत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी महिला पोलीस, अधिकारी यांची गस्त वाढवावी असे आमदार लांडगे म्हटले आहे.
---------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा