श्री क्षेत्र देहू येथील शिळामंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे म्हणून देहू संस्थानच्या विश्वस्तांनी नवी दिल्ली येथे जाऊन त्यांची भेट घेत त्यांना निमंत्रण दिले. ्मोदी यांनी या मंदिराचे उदघाटन माझ्या हस्ते झाल्यास ते मी माझे भाग्य समजेन अशा शब्दात मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे विश्वस्तांनी सांगितले.
या वेळी विश्वस्तांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पगडी, शाल, तुळशीचा हार घालून त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांना तुकोबांची गाथा, वीणा आणि चिपळ्या भेट म्हणून दिल्या. त्यांचा मोदी यांनी सहर्ष स्वीकार केला. त्या वेळी त्यांनी विश्वस्तांबरोबर फ़ोटोही काढून घेतले. याची ही काही क्षणचित्रे खास आपल्यासाठी........
देहू येथील शिळामंदिराच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण video
Reviewed by ANN news network
on
३/३१/२०२२ १२:२७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/३१/२०२२ १२:२७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: