विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस आज पिंपरी चिंचवडमध्ये

अनेक विकासकामांची उद्घाटने पिंपरी : राज्याचे विरोधीपक्ष नेता आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र आज रविवारी पिंपरी चिंचवड शहराच्या दौर्याचवर येत असून त्यांच्या हस्ते शहरातील अनेक विकासकामांची उद्घाटने केली जाणार आहेत. दुपारी दोन वाजता पिंपळेनिलख येथील बाणेर पुलाजवळील अशोक कामठे उद्यानाचे उद्घाटन, अडीच वाजता ’ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन, तीन वाजता प्रभाग क्रमांक 24 सेक्टर नंबर 22 थेरगाव येथील खेळाच्या मैदानाचे उद्घाटन, सव्वातीन ते पावणेचारच्या दरम्यान मोरवाडीतील नवीन विरंगुळा केंद्र, अण्णासाहेब पाटील स्मारक उद्घाटन व प्रभाग क्रमांक दहा येथील शिवशाहूशंभो उद्यान, राजर्षी शाहु महाराज क्रीडांगण व व्यायामशाळेचे नामकरण, बर्ड व्हॅली म्युझिकल फाऊंटनचे उद्घाटन केले जाणार आहे. सव्वाचार वाजता पूर्णानगर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यानाचे लोकार्पण, सेक्टर क्रमांक चार साईनाथ हॉस्पिटल शेजारील उद्यान व सेक्टर क्रमांक तीन स्केटींग ग्राऊंड समोरील उद्यानाचे उद्घाटन, सायंकाळी पाच वाजता भोसरीतील कुस्ती केंद्राचे उद्घाटन आणि सायंकाळी साडेपाच वाजता बोपखेल येथील बहुउद्देशीय इमारतीचे फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस आज पिंपरी चिंचवडमध्ये विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस आज पिंपरी चिंचवडमध्ये Reviewed by ANN news network on ३/०५/२०२२ ११:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".