पिंपरी येथे गांजा विकणा-यांना अटक

पिंपरी : पिंपरीगावातील नवमहाराष्ट्र शाळेनजीक असलेल्या एस.के. वाघेरे कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये गांजा आणि गुटखा विकणा-याना रविवारी सायंकाळी ६च्या सुमारास पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ११ किलो गांजा आणि अन्य साहित्य मिळून ३ लाख १ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दीपक उर्फ दीपेश इंद्रेकर (वय २४), गौतम किसन गायकवाड (वय ४७), रेखा पोपटसिंग तामचीकर (वय ३८), यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्र. १ आणि २ यांना अटक करण्यात आली असून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण , उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, सहायक पोलिस फौजदार विजय कांबळे, किशोर पढेर, कल्याण महान, संतोष बर्गे, सुनील शिरसाठ, नितीन लोंढे, मोहिनी थोपटे, मारूती करचुंडे, संगीता जाधव, अतुल लोखंडे, रेशमा झावरे यांनी ही करवाई केली.
पिंपरी येथे गांजा विकणा-यांना अटक पिंपरी येथे गांजा विकणा-यांना अटक Reviewed by ANN news network on ३/२९/२०२२ ०२:१५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".