रविवार, १६ जानेवारी, २०२२
केंद्रसरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन
पिंपरी : युपीए सरकारच्या काळात चारशे रुपयाला मिळणारा घरगुती गॅस भाजपच्या मोदी सरकारने एक हजार रुपयांपेक्षा जास्त महाग केला आहे. उज्ज्वला गॅस योजनेसाठी देण्यात येणारे अनुदान मागील दोन वर्षांपासून बंद केले असून यासाठी वापरण्यात येणार्याा संगणक प्रणालीमध्ये बदल करुन हजारो कोटींचा भ्रष्टाचार केंद्र सरकारने केला आहे. हा गैरव्यवहार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी उघड केला आहे. भ्रष्टाचारी सरकारने महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांनी केली.
रविवारी पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळा चौकात नढे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसच्या महिलांनी उज्ज्वला गॅस योजनेचे अनुदान केंद्र सरकारला संक्रांतीचा वाण म्हणून परत केले आणि केंद्र सरकारचा निषेध करीत घोषणा दिल्या. यावेळी स्वाती शिंदे, छाया देसले, नंदा तुळसे, सुप्रिया पोहरे, निर्मला खैरे, निगार बारसकर, रचना गायकवाड, वैशाली गोडसे, भारती घाग, सुवर्णा कदम, सुनिता जाधव आदींसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
यावेळी सायली नढे म्हणाल्या, केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजनेची फसवी जाहिरात केली. या योजने विषयी ‘कॅग’ ने गंभीर आक्षेप घेतले आहेत. या आक्षेपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अद्यापही का खुलासा केला नाही असा प्रश्न देशभरातील महिला विचारत आहेत. ही योजना फक्त महिलांसाठी असून 1 लाख 88 लाख हजार कनेक्शन पुरुषांच्या नावे दिलीे आहेत. या योजनेत मिळणारा सिलेंडर 850 रुपयांना आहे तर अनुदान अवघे 35 रुपये आहे ते देखिल मागील दोन वर्षांपासून दिले जात नाही. फसवी जाहिरातबाजी करुन महागाई वाढ करणार्याह या भाजप प्रणित मोदी सरकारचा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत.
सुत्रसंचालन नंदा तुळसे यांनी केले. आभार भारती घाग यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा