पुणे ःभारतीयविद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ' तू छेड सखी सरगम ' या कार्यक्रमाला शनीवारी चांगला प्रतिसाद मिळाला. अहिरभैरव, यमन, बागेश्री, भीमपलास, भैरव अशा सदाबहार रागदारीवर आधारित गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले !
८ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमांत राग संगीतावर आधारित लोकप्रिय गाणी आणि रागांचा परिचय आणि लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना , संहिता आणि निवेदन सुप्रिया चित्राव यांचे होते.श्रृती देवस्थळी , अभिजीत पंचभाई यांनी गीते सादर केली. विनीत तिकोनकर यांनी तबल्यावर ,हार्मोनिअमवर प्रसन्न बाम यांनी, तालवाद्यावर धनंजय साळुंके यांनी साथसंगत केली.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्व कलाकारांचा ज्ञानेश्वरी देऊन सत्कार करण्यात आला.
'तू छेड सखी सरगम' या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अहिर भैरव रागातील 'अलबेला सजन', 'पुछो ना कैसे मैने रैन बितायी' आणि 'माझिया मना' ही बहारदार गीते सादर केली गेली.
राग बागेश्री मधील 'येथोनी आनंदू', 'राधा ना बोले, ना बोले' तसेच भीमपलास रागातील 'जय शारदे वागेश्वरी', 'वृंदावनी वेणू' , 'तुझ्या गळा ,माझ्या गळा', 'आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे ','नयनों में बदरा छाये', 'खिलते है गुल यहाँ', 'किस्मत से तुम' ही गीते सादर करून रसिकांची दाद मिळवली.
कार्यक्रमात यानंतर यमन रागातील 'समाधी साधन', 'जिथे सागरा', 'शुक्रतारा मंदवारा' या गीतांनंतर 'पिकल्या पानाचा ,देठ की हो हिरवा' ही गीते सादर करण्यात आली.'आज जाने की जीद ना करो', 'जब दीप जले आना', 'जरासी आहट', 'चंदन सा बदन', 'जिया ले गयो', 'छुपा लो यु', 'एहसान तेरा', ' अभी न जाओ' अशा प्रकारची यमन रागातील अनेक लोकप्रिय चित्रपट गीते सादर करण्यात आली.
तू छेड सखी सरगम या गीतांच्या कार्यकमाचा समारोप भैरवी रागातील गाण्यांनी करण्यात आला. 'कैवल्याच्या चांदण्याला', 'माता सरस्वती' , 'लागा चुनरी में दाग' आणि कार्यक्रमाच्या शेवटी 'मिले सूर मेरा तुम्हारा' या गीताने रसिक मंत्रमुग्ध झाले.
हा कार्यक्रम विनामूल्य होता .‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ११० वा कार्यक्रम होता. प्रवेश कोविड विषयक सर्व प्रोटोकॉल पाळून दिला गेला .
' तू छेड सखी सरगम 'कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद
Reviewed by ANN news network
on
१/०९/२०२२ ०९:५७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: