बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

भारताचे सेनादल प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

photo credit- scroll.in
मुंबई : देशाचे सेनादल प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर तामिळनाडूमध्ये कुन्नूर जवळ कोसळले.या अपघातात जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला.
 हेलिकॉप्टरमध्ये एकंदर 14 प्रवासी होते. त्यांच्यापैकी ग्रूप कॅप्टन वरूण सिंग जखमी झाले आहेत.त्यांच्यावर वेलींगटन सेना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेचे वृत्त कळताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपला महाराष्ट्राचा दौरा रद्द करून दिल्लीकडे रवाना झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा