भाजप उत्तर भारतीय मोर्चातर्फे नीट परीक्षार्थींसाठी मोफत प्रशिक्षण


मुंबई :  भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे नीट परीक्षार्थींसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ माजी शिक्षण मंत्री आ. आशीष शेलार यांच्या हस्ते शनिवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झाला.

 उत्तर भारतीय मोर्चाचे प्रमुख संजय पाण्डेयआर. डी. यादवसंतोष सिंग आदी उपस्थित होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नीट परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. अशा विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग देण्याचा उपक्रम अभिनंदनीय आहेअसे आ.शेलार यांनी या प्रसंगी सांगितले. मोर्चाचे प्रमुख संजय पाण्डेय यांनी सांगितले कीज्यांना पहिल्या प्रयत्नांत नीट परीक्षेत उत्तीर्ण होता आलेले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन या वर्गातून मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी 

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScPSBFHH7ZMWVEnrAUczsumSbm3d9lUSCufSRp4mCxrKcPPbQ/viewform?usp=sf_link   या लिंकवर क्लिक करून नाव नोंदणी करावीअसेही श्री. पाण्डेय यांनी सांगितले.

भाजप उत्तर भारतीय मोर्चातर्फे नीट परीक्षार्थींसाठी मोफत प्रशिक्षण भाजप उत्तर भारतीय मोर्चातर्फे नीट परीक्षार्थींसाठी मोफत प्रशिक्षण Reviewed by ANN news network on १२/०६/२०२१ ०२:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".