मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

विशेष सर्वसाधारण सभा घ्या; तळेगावातील काही नगरसेवकांची मागणी

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेची या पंचवार्षिक मधील अखेरची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी घ्यावी. अशी मागणी सत्तारुड भारतीय जनता पक्षाच्या काही नगरसेवकांनी केली आहे. यास नगराध्यक्षा कसा प्रतिसाद देतात यावर ही सभा होणार की नाही हे ठरणार आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेवकांची मुदत 6 जानेवारी 2022 मध्ये संपत आहे. या राहिलेल्या 15 दिवसाच्या काळात काही मोजके विषय घेऊन हि सभा घ्यावी. तसेच या सभेत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा कामकाज करून नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करावे.अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे. गेली दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे नगर परिषदेत अत्यंत कमी प्रमाणार सभा कामकाज झाले. यामध्ये काही मोजक्या सभा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या व्दारे झाल्या यामध्ये काही सदस्यांनी या सभा घेण्यास विरोध केला होता.अश्या सभा घेण्यावरून नगराध्यक्षा व नगरसेवकांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता.तसेच ऑफ लाईनच्या सभा मध्ये काही विषयावरून वादळी चर्चा होऊन कामकाजामध्ये आरोप प्रत्यारोपाने सभा गाजल्या होत्या. तसेच काही सभा तहकूब कराव्या लागल्या होत्या. नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारीपदी सतीश दिघे यांनी पदभार घेतल्यावर व्हिडीओ कॉन्फरन्स व ऑफ लाईन अश्या काही मोजक्याच सभा संपन्न झाल्या.दिघे यांनी पदभार घेण्यापूर्वी प्रभारी मुख्याधिकारी यांचेकडे पदभार होता.त्यामुळे प्रशासकी कामकाज व विकास कामांची गती मंदावली होती. गेली दोन वर्ष कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सगळी प्रशासकीय यंत्रणा राबवावी लागली होती. त्यामुळे याकाळात नगर परिषदेस मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले व विकास कामांना खिळ बसली.यासाठी हि सभा घेउन शहरातील सकारात्मक विषय सभेपुढे चर्चेला घ्यावेत अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा