रविवार, ५ डिसेंबर, २०२१

आळंदीत संजीवन समाधीदिन सोहळ्याची सांगता

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२६ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याची सांगता हरिनाम गजरात झाली. या सोहळ्यासाठी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील, विश्वस्त डॉ. अभय टिळक, पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र बाळासाहेब आरफळकर , व्यवस्थापक माउली वीर, श्रीधर सरनाईक, संजय रणदिवे, सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, रामभाऊ रंधवे, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगिराज कुèहाडे, योगेश आरु, माऊली जळगावकर, अनिल कुèहाडे, विनायक घुंडरे, सचिन कुèहाडे, प्रियेश रानवडे, महेश केदारी, मच्छिंद्र शेंडे, पुजारी अमोल गांधी, श्रींचे सेवक पुजारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक अधिकारी यांनी उपस्थित होते. सांगता दिनी पहाट पूजेत पवमान अभिषेक व दुधारती नंतर भाविकांना महापूजा व दर्शनास गाभारा खुला करण्यात आला. दुपारी दर्शन बंद ठेवण्यात आले. महानैवेद्या नंतर पूना भाविकांना संजीवन समाधी दर्शनास गाभारा खुला झाला.संतोष महाराज मोझे यांचे वतीने वीणा मंडपात ह.भ.प.नारायण महाराज जाधव यांची कीर्तन सेवा झाली.पालखीची नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. मानकरी, फडकरी यांना नारळ प्रसाद व समाधी दर्शन होवून यात्रेची सांगता झाली. माउली मंदिरात माऊली करंजीकर यांची दही हंडी काल्याची कीर्तन सेवा झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा