शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१
पिंपरी चिंचवड पालिका मुख्यालयाच्या आवारात डॉक्टरचा जाळून घेण्याचा प्रयत्न
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात काम करणा-या एका डॉक्टरने शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास महापालिका मुख्यालयाच्या आवारात स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. या डॉक्टरचे आडनाव चाटे असे असल्याचे समजते.
दुपारी साडेतीनच्या सुमारास महापालिका आवारात आल्यानंतर बाहेर जाण्यासाठी असलेल्या फाटकाजवळ त्याने सोबत आणलेले डिझेल अंगावर ओतून घेतले आणि लायटरच्या सहाय्याने तो स्वत:स जाळून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच बाजूला उभ्या असलेल्या पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून लायटर हस्तगत केला आहे. मागील काही महिन्यांपासून आपला पगार झालेला नाही या शिवाय आपल्या काही अडचणी आहेत; त्यामुळे आपणाला आरोग्य वैद्यकीय विभागाचे प्रभारी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याशीच बोलायचे आहे असा आग्रह या डॉ़क्टरने धरला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा