बोपोडी : पुणे महानगरपालिकेच्या उर्दू माध्यमिक शाळेत या शैक्षणिक वर्षात उर्दू माध्यमातील 11 वी आणि 12 वीचे वर्ग सुरू होणार आहेत. विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे हे वर्ग असतील.
पुणे शहर व पुणे जिल्ह्यात लोणावळा, शिरूर, जुन्नर, मंचर, बारामती, पिंपरी चिंचवड अशा कुठेही अशी व्यवस्था नाही.
ही उणीव तंजीम-ए-वालेदिनचे सरचिटणीस अब्दुलगनी मुजावर आणि बोपोडीचे नगरसेवक प्रकाश ढोरे यांच्या लक्षात आली. ढोरे यांनी खास प्रयत्न करून या वर्गाना मान्यता मिळविली. त्यांच्याच प्रयत्नामुळे बोपोडी उर्दू प्राथमिक शाळेत यावर्षी नर्सरीपासून उर्दू-इंग्रजीचे ई-लर्निंग सुरू करण्यात आले असून मुलांचे प्रवेश सुरू झाले आहेत. जवळच रेल्वेस्थानक आणि बसची सोय असल्याने दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कनिष्ठ महाविद्यालय सोयीचे होणार आहे.
बोपोडीतील प्रत्येक जातीच्या आणि समाजातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे" असे ढोरे यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा