पिंपरी : पिंपरी शहरातील कामगारनगर, रोपलास, खराळवाडी या परिसरात बुधवारी रात्री काही समाजकंटकांनी रस्त्याच्या बाजूस पुन्हा करून ठेवण्यात आलेल्या मोटारींच्या काचा फोडून नुकसान केले आहे. अलीकडे काही दिवस या परिसरातील महापालिकेच्या उद्यानांमध्ये दिवसा आणि रात्री वेळी दारुडे आणि गांजेकस यांचा वावर वाढला आहे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे परिसरातील सार्वजनिक शांततेचा भंग होत आहे. महापालिकेने आपल्या उद्यानावर सुरक्षारक्षक नेमावेत तसेच पिंपरी पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा