सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

भारतीय विद्या भवनमध्ये १० डिसेंबर रोजी 'शिवतांडव'कार्यक्रम

पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सुकृती कथक डान्स अॅकॅडमी (पुणे) यांच्या ' शिवतांडव' या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमांत नटराज शिवशंकराच्या सात तांडव नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे.कार्यक्रमाची संकल्पना आणि नृत्यदिग्दर्शन मनीषा अभय यांचे असून संगीत चिन्मय कोल्हटकर, अमोद कुलकर्णी यांचे आहे. मनीषा अभय, सिध्दी अभय, कल्याणी कुलकर्णी, श्रध्दा जोशी, चैत्रा गोडबोले, सई जाधव, विनया महेश, सुहानी, गार्गी, साना, पूर्वा सहभागी होणार आहेत. मधुरा ओक निवेदन करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १०७ वा कार्यक्रम आहे.प्रवेश कोविड विषयक सर्व प्रोटोकॉल पाळून दिला जाईल .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा