राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर सेलच्या अध्यक्षपदी डॉ.सुनील जगताप यांची फेरनिवड

पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी डॉक्टर सेल अध्यक्षपदी डॉ.सुनील जगताप यांची  फेरनिवड झाली आहे.डॉ.हेमंत तुसे,डॉ.परशुराम सुर्यवंशी,डॉ.संगीता खेनट,डॉ.अनिल दुधभाते यांची पुणे शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,होमिओपॅथी कौन्सिलच्या माजी अध्यक्ष डॉ.रजनी इंदुलकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

डॉ.शंतनू जगदाळे (हडपसर विधानसभा अध्यक्ष),डॉ.राहुल सुर्यवंशी(राज्य समन्वयक, डॉक्टर सेल),डॉ.शिवदीप उंद्रे(पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष),संजय जगताप(पॅरामेडिकल प्रमुख),डॉ.राजेंद्र जगताप,डॉ.सुनील होनराव,डॉ.शशिकांत कदम,डॉ.पवन सोनवणे,डॉ.राजेश साठे,डॉ.योगेश कदम,डॉ.संगीता माने,डॉ.अनुपमा गायकवाड,डॉ.रवींद्र सुतार,डॉ.गणेश निंबाळकर,डॉ.सौ अर्चना पवार व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.ही बैठक रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे झाली.
 
या बैठकीत वैद्यकीय क्षेत्रातील प्रश्न,२३ जानेवारीच्या डॉक्टर सेलच्या प्रदेश स्तरावरील मेळाव्याच्या तयारीची चर्चा करण्यात आली.महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन,महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी कौन्सिलच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली.'संघटनात्मक वाढीवर सर्वांनी लक्ष केंद्रीत करावे,संघटन बळकट झाले,तरच वैद्यकीय क्षेत्राचे आणि वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रश्न सुटतील. नेटवर्क चांगले असेल,मेहनत घेतली तर कौन्सिलच्या निवडणुकीत यश मिळते',असे डॉ. नरेंद्र काळे यांनी सांगितले.डॉ.सुनील जगताप यांनी राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर सेलच्या अध्यक्षपदी डॉ.सुनील जगताप यांची फेरनिवड राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर सेलच्या अध्यक्षपदी डॉ.सुनील जगताप यांची  फेरनिवड Reviewed by ANN news network on १२/२०/२०२१ ०२:०८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".