पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मागील सुमारे पंधरा वर्षांपासून मानधन तत्वावर काम करीत असलेल्या परिचारिका आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना महापालिकेने कायम नोकरीत घ्यावे अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबत लांडगे यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की महापालिकेने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कायमस्वरूपी नोकर भरतीसाठी जाहिरात दिली आहे या पदावर मागील अनेक वर्षे याच रुग्णालयात सेवा देत असलेल्या मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना सामावून घेणे सयुक्तिक राहील.
महापालिकेने रुग्णालयातील नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात येऊन महापौर माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समोर आपले गाऱ्हाणे मांडले या विषयी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन आमदार लांडगे यांनी आयुक्तांना वरीलप्रमाणे पत्र दिले आहे.
मानधन तत्वावर काम करणा-या कर्मचा-यांचा विषय मार्गी लागेपर्यंत कायमस्वरूपी भरती थांबवावी आणि मानधनावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा