मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळणार; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

पिंपरी : महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी आग्रही मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. त्यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतची फाईल माझ्याकडे आली आहे. दोन ते तीन भाषांबाबतही प्रस्ताव आला आहे. यासंदर्भात लवकरात-लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिले. त्यामुळे मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.याबाबत खासदार बारणे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री रेड्डी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. मराठी भाषा ही राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा, सर्वसामान्य माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला लवकरातलवकर अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली. याबाबतच्या निवेदनात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, मराठी भाषेस गौरवशाली व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. अनेक वर्षांपासूनचे मराठी भाषांचे शिलालेख, कोनशिला, ताम्रलेख, पुरातन साहित्य, वस्तू इत्यादी देखील भारतीय पुरातत्व विभागाकडे उपलब्ध आहेत.महाराष्ट्रातील मुख्य भाषा मराठी आहे. भारतातील भाषांपैकी मराठी भाषा एक प्रमुख भाषा आहे. महाराष्ट्र, गोव्याची अधिकृत भाषा मराठी आहे. मातृभाषेच्या संख्येच्या बाबतीत मराठी जगात पंधराव्या तर भारतात चौथ्या क्रमांकावर आहे. मराठी भाषा बोलणा-यांची लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. इ.स.वी सन ९०० पासून ही भाषा प्रचलित आहे. हिंदीच्या समान संस्कृतवर आधारित मराठी भाषा आहे. भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते. याशिवाय गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि छत्तीसगडमध्ये मराठी भाषा बोलली जाते. केंद्रशासित प्रदेशांमध्ये दमणदीव, आणि दादरा आणि नगर हवेलीमध्येही मराठी भाषा बोलली जाते.भारतातील अधिकृत २२ भाषांपैकी मराठी एक भाषा आहे. मराठी भाषा देवनागिरी लिपीत लिहिलेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे २०१३ पासून पत्रव्यवहार केला जात आहे. याबाबतचा प्रस्तावही राज्य सरकारने ८ डिसेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. कविश्रेष्ठ वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये २७ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी ‘मराठी भाषा गौरवदिन’ म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे २७ फेब्रुवारी २०२२ च्या पूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी विनंती खासदार बारणे यांनी केली.
मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळणार; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळणार;  खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती Reviewed by ANN news network on १२/२३/२०२१ ११:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".