शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१
मदतीसाठी आवाहन
पुणे : ज्येष्ठ कवी, गझलकार म. भा. चव्हाण यांचा मुलगा पृथ्वीराज याला वयाच्या २७ व्या वर्षी दुर्धर अशा लाळेच्या ग्रंथीच्या कर्करोगाने ग्रासले आहे.त्याच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात केमोथेरपीचे उपचार सुरू आहेत. त्यानंतर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डिसेंबर महिन्याच्या अखेरीस केली जाणार आहे. औषधोपचार व शस्त्रक्रिया यासाठी जवळपास १५ लक्ष रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे.
चव्हाण यांचा प्रकाशनाचा व त्यांच्या पत्नीचा केटरिंगचा व्यवसाय यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर हा खर्च कसा पेलायचा हे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे इतकी मोठी रक्कम इतक्या कमी वेळेत जमा करणे कठीण आहे. त्यामुळे यामाध्यमातून आपणा सर्व बंधूभगिनींना आवाहन करण्यात येत आहे की आपण सर्वांनी त्यांना यथाशक्ती आर्थिक मदत करावी.मदत थेट त्यांच्या बँक खात्यावर पाठवायची आहे. त्याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे
खात्याचे नाव : Machindra Bhagaji Chavan
बँकेचे नाव व शाखा : Bank of India, Kothrud
खाते क्रमांक : 052310110008516
IFSC Code : BKID0000523
Google Pay / Phone Pe / Paytm : 9922172976
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा