मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

दापोडीतील 'एसआरए' प्रकल्प रद्द करण्यासाठी मोर्चा



पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील नियोजित झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रद्द करण्यात यावा या मागणीसाठी सोमवारी या परिसरातील नागरिकांच्या संयुक्त कृती समितीने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून महापालिकेच्या मुख्यालया बाहेर जोरदार निदर्शने केली.
दापोडीतील जय भिमनगर, सिद्धार्थ, गुलाबनगर, लिंबोरी वस्ती, महात्मा फुलेनगर या भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी हा एल्गार महामोर्चा काढण्यात आला. प्रकल्प रद्द करावा अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली.
मोर्चात माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, सनी ओव्हाळ, रमा ओव्हाळ, विनय शिंदे, सिंकदर सुर्यवंशी, अक्षय गायकवाड, प्रीतम कांबळे आदी सहभागी झाले होते.
या प्रकल्पाला 90 टक्के स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. प्रकल्पाच्या विरोधात हजारो हरकती आहेत. हा प्रकल्प कायमस्वरुपी रद्द करावा अशी आमची मागणी आहे असे राहुल डंबाळे यांनी सांगितले.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा