किसानबाग आंदोलकांकडून आनंद व्यक्त


पुणे : तीन अन्यायकारक कृषी कायदे पंतप्रधानांनी मागे घेतल्याच्या घोषणांनी किसान बाग आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी आनंद व्यक्त केला आहे .इन्क्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे असलम बागवान यांनी पत्रक काढून हा आनंद व्यक्त केला आहे. बागवान यांनी पुण्यात किसान बाग आंदोलनात  जिल्हाधिकारी कार्यालया समोर 21 दिवस सत्याग्रह केला होता. राज्यात तसेच राजस्थान, गुजरात , मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात जाऊन आंदोलनात सहभाग घेतला होता. पुणे ते दिल्ली मोटरसायकल यात्रा, पुणे ते मुंबई सायकल यात्रा काढली होती. मेधा पाटकर,प्रतिभा शिंदे ,सुभाष वारे, मानव कांबळे, संतोष म्हस्के, सुनीती सु.र. या मान्यवरांना बरोबर बागवान आणि सहकारी विविध सत्याग्रहात सहभागी झाले .बागवान यांच्या समवेत सचिन अल्हाट, इब्राहीम खान, कबीर शेख, राजू सय्यद , शानू पठाण ,साहिल मणियार  निखिल जाधव हे कार्यकर्ते सहभागी झाले होते
किसानबाग आंदोलकांकडून आनंद व्यक्त किसानबाग आंदोलकांकडून आनंद व्यक्त Reviewed by ANN news network on ११/१९/२०२१ ०३:४९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".