गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चंद्रकांत पाटील यांची भेट

 



मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत  पाटील यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकारमंत्री तसेच भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली.

 

चंद्रकांत  पाटील यांनी अमित शाह यांना भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली व त्यांचे मार्गदर्शन घेतले. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही  चंद्रकांत पाटील यांनी  अमित शाह यांना माहिती दिली. राज्यातील सद्यस्थितीबाबत उभय  नेत्यांची चर्चा झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा