तळेगाव दाभाडे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त कलापिनी निर्मित सृजन नृत्यालय प्रस्तुत ‘अमृत संजीवनीङ्क या नृत्यनाट्याचा प्रयोग दूरदर्शनवर सादर करण्यात आला. त्यात तळेगावातीँल ६० कलाकारांनी सहभाग घेतला होता. त्यांचा सत्कार भारतीय जनता पक्ष, तळेगाव दाभाडे शहर सांस्कृतिक आघाडी कडून करण्यात आला.
हा समारंभ २७ रोजी संध्या. ७ वा. येथील शिवाजी महाराज चौक येथे घेण्यात आला. या वेळी सर्व कलाकारांचे सन्मानपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी या नाटकाच्या दिग्दर्शिका मीनल कुलकर्णी यांचा शाल,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन भाजपा शहर अध्यक्ष रविंद्र माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मीनल कुलकर्णी यांनी सांस्कृतिक आघाडीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
या समारंभाचे सूत्रसंचालन गणेश उंडे यांनी केले. यावेळी दिनेश कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, श्रीपाद भिडे, अमोल गोरे , विनायक भेगडे, प्रदीप गटे, अंजली सहस्त्रबुद्धे, श्रीशैल गद्रे, विनायक भालेराव, रामचंद्र रानडे, संजय मालकर आदी उपस्थित होते. कलापिनीच्या कलाकारांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रसेविका समितीच्या अधिकारी श्रीमती सुनंदा जोशी यांनी केले.
अमृतसंजीवनी नृत्यनाट्यातील कलाकारांचा सत्कार
Reviewed by ANN news network
on
११/२८/२०२१ १०:०१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: