कृत्रिम महागाई विरोधात पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे हाहाकार आंदोलन



पिंपरी : केंद्रातील भाजपा प्रणित मोदी सरकारने निर्माण केलेली कृत्रिम महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी कामगारांवर लादलेले अन्यायकारक कायदे व इतर अन्याय कारक धोरणांविरोधात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हाहाकार जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे.
हे अभियान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती पासून 14 नोंव्हेबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे या अतंर्गत पदयात्रा, प्रभात फेर्या, कोपरासभा, पत्रके वाटप असे जनजागरणपर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
या अभियानाबाबत आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व शहर काँग्रेसचे सहप्रभारी विजय बारसे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी खराळवाडी येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात पार पडली. या वेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीस सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना बारसे म्हणाले,कार्यकर्त्यांनी या निवडणूकीत स्वबळावर लढण्याची तयारी करावी, येत्या मनपा निवडणूकीत काँग्रेसचा झेंडा फडकावावा, सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे पक्षाने दिलेल्या जबाबदारीचा सर्वाकडून योग्य मान राखला जावा, या अभियानाचा उपयोग करून संपर्क वाढवत तयारीला लागावे.
याबाबत माहीती देताना कैलास कदम म्हणाले, नागरिकांची घोर फसवणूक झाली आहे, भाजपा सरकारने नागरिकांवर कृत्रिम महागाई लादली आहे, शेतकरी व कामगारांवर अन्यायकारक कायदे लादले जात आहेत, प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे व या मुळे नागरिक त्रस्त आहेत नागरिकांच्या आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हे अभियान शहरभर राबविले जाणार आहे नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ही कदम यांनी केले आहे.
या प्रसंगी माजी महापौर कविचंद भाट, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितूले, माजी उपसभापती शाम आगरवाल, माजी नगरसेवक सदगुरू कदम विश्वास गजरमल, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, सौ.छायाताई देसले, एन एस यु आय चे शहराध्यक्ष डॅा वसीम ईनामदार, प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव कौस्तुभ नवले, अजिंक्य बारणे, माऊली मलशेट्टी, ईस्माईल संगम, के एम रॅाय, के हरीनारायणन, विजय ओव्हाळ, उमेश बनसोडे, सज्जी वर्की, बाबा बनसोडे, आबा खराडे, रोहीत तिकोणे, शाम भोसले, मिलिंद बनसोडे, महादेव चव्हाण, संजीव झोपे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

कृत्रिम महागाई विरोधात पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे हाहाकार आंदोलन कृत्रिम महागाई विरोधात पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे हाहाकार आंदोलन Reviewed by ANN news network on ११/१६/२०२१ ०१:११:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".