सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

'जिवो जिवस्य जीवनम् ' माहितीपटाची इंडिया इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड

पुणे : पुण्यातील युवा दिग्दर्शक सिध्दार्थ बाळकृष्ण दामले यांच्या  'जिवो जिवस्य जीवनम् ' या  माहितीपटाची इंडिया इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. हा फेस्टिव्हल गोवा येथे १० ते १३ डिसेंबर दरम्यान होणार आहे.

परसबागेतील बुलबुल पक्ष्याच्या जोडी कडून घरट्याची निर्मिती,  त्यावर बहिरी ससाण्याचा हल्ला, उरलेल्या अंडयातून होणारे प्रजनन , पुढे जाणारे जीवन आणि यातून निसर्गाचा दिला जाणारा संदेश, हा या माहितीपटाचा विषय आहे.

डॉ. बाळकृष्ण दामले यांची निर्मिती असून मोहिनी दामले, मिलिंद पाटील यांनी माहितीपटासाठी संशोधन केले. राजश्री गोखले यांनी निवेदन केले असून तांत्रिक बाजू वासिम पठाण यांनी सांभाळली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा