पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विषय समित्यांवर सदस्यांच्या नियुक्त्या बुधवारी झालेल्या सभेत करण्यात आल्या. सत्ताधारी भाजप आणि सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यांची नावे महापौरांकडे दिली. त्या प्रमाणे सदस्यांची नियुक्ती झाल्याची घोषणा सभागृहात करण्यात आली. नवनियुक्त सदस्य पुढीलप्रमाणे आहेत.
विधी समिती : भाजप- संगीता भोंडवे, सुनिता तापकीर, स्वीनल म्हेत्रे, वसंत बोराटे, कोमल मेवाणी, राष्ट्रवादी-संगिता ताम्हाणे, गीता मंचरकर, विक्रांत लांडे, शिवसेना- अमित गावडे
महिला व बालकल्याण समिती : भाजप-सविता खुळे, उषा मुंडे, योगिता नागरगोजे, निर्मला गायकवाड, राष्ट्रवादी- स्वाती काटे, अनुराधा गोफणे, सुमन पवळे, शिवसेना- रेखा दर्शले
शहर सुधारणा समिती : भाजप- आरती चौंधे, बाळासाहेब ओव्हाळ, सोनाली गव्हाणे,साधना मळेकर, अनुराधा गोरखे, राष्ट्रवादी- वैशाली घोडेकर, संतोष कोकणे, समीर मासुळकर, शिवसेना- सचिन भोसले
क्रीडा, कला समिती: भाजप नीता पाडळे, शारदा सोनवणे, उत्तम केंदळे, अश्विनी जाधव, शर्मिला बाबर, राष्ट्रवादी- अपर्णा डोके, डब्बू आसवानी, राजू मिसाळ
शिक्षण समिती : भाजप : माधवी राजापूरे,मनीषा पवार, प्रियांका बारणे, सारिका सस्ते, शैलेश मोरे,राष्ट्रवादी- प्रज्ञा खानोलकर, भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे, शिवसेना- अश्विनी वाघमारे
महापालिकेच्या विषय समित्यांवर सदस्यांची नियुक्ती जाहीर
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२१ १२:३६:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: