पिंपरी : भारतीय स्वातंत्र लढ्याविषयी चूकीचे वक्तव्य करणा-या कंगना राणावतचे आणि तिचे समर्थन करणा-या विक्रम गोखले यांचे चित्रपट पिंपरी चिंचवड शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम यांनी दिला.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी आंबेडकर पुतळा चौकात राणावत व गोखले यांचा निषेध करीत त्यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले आणि त्यांच्या प्रतिमेवर शाई फेकण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव गौतम आरकडे, पर्यावरण विभागाचे प्रदेश अध्यक्ष अशोक मोरे, पिंपरी चिंचवड युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी महापौर कविचंद भाट तसेच ज्येष्ठ नेते पांडूरंग गडेकर, विजय ओव्हाळ, ज्ञानेश्वर मलशेट्टी, हिराचंद जाधव, आबा खराडे, के. एम. रॉय, के. हरि नारायण, इस्माईल संगम, रोहित भाट, विश्वनाथ जगताप, नयन पांलाडे, रोहित तिकोणे, छायाताई देसले, पूजाताई बिबवे, कबीर मोहम्मद, हमीद इनामदार, बाबा बनसोडे, बाबा गायसमुद्रे, विशाल सरवदे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा