मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

एसटी विलीनीकरणाचा प्रश्न विधानसभेत मांडणार : आमदार लक्ष्मण जगताप

 



पिंपरी : एसटी विलीनीकरणाचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडून एसटीच्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत असे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यस्तर कर्मचार्यांच्या संपाला पाठिंबा देण्याकरिता पिंपरी चिंचवड नगरीतील वल्लभनगर एसटी आगाराला आमदार जगताप यांनी भेट देऊन संपावर बसलेल्या कर्मचार्यांना पाठिंबा व्यक्त केला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, ऐन दिवाळीत संशोधित कर्मचार्यांना पगार नसल्यामुळे कुटुंबियांसोबत दीपावली साजरी करण्यास आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले. त्यामुळे जवळपास 27 ते 28 कर्मचार्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या.
एसटी कर्मचार्यांना राज्यशासनाच्या परिवहन विभागात कायम सामावून घ्यावेाशी मागणी आहे. त्यांचा हा प्रश्न शासन दरबारी मांडण्याची हमी मी देतो.
जगताप यांनी आत्महत्या केलेल्या दिवंगत कर्मचार्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, चिंचवड विधानसभेचे प्रभारी संतोष कलाटे उपस्थित होते.
चौकट
महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ मामा यांनी आमदार लक्ष्मण जगताप व भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष अनुप मोरे व चिंचवड विधानसभा मतदार संघाचे प्रभारी संतोष कलाटे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला . त्यांच्या समवेत अक्षय मोहिते, प्रशांत मोहिते, विकी कदम, अनंत पडवळ ,अजय चव्हाण रवी मोहिते, संदीप कदम ,मयूर मोडवे विनोद भाऊ पासलकर अजय भाऊ थोरात, राजू मारटकर आदी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांनीही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा