पुणे : इनक्रेडिबल समाजसेवक ग्रूपतर्फे २६ नोहेंबर रोजी संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थापक अस्लम इसाक बागवान यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
दुपारी २ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्हॅली व्हयू स्कूल, मिठानगर, कोंढवा खुर्द येथे भारतीय संविधानाबद्दल जनजागरण केले जाणार आहे.
संविधान सभा, संविधान जागर, संविधान रक्षण, संविधान शाळा, या उपक्रमाचे आयोजन केले असून त्यात शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरिक यांना संविधानाची माहिती दिली जाईल.
या कार्यक्रमात मानव कांबळे, माजी नगरसेवक मारूती भापकर, लक्ष्मी श्रीकांत, संदिप बर्वे, साधना दधीच, सुनिती सु.र., इब्राहिम खान, डॉ.दिपक बिडकर ,मनिष देशपांडे, संविधान प्रचारक टिम , इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे सर्व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा