पिंपरी : पिंपरी चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस उद्या शनिवारी आहे. त्यानिमित्त त्यांच्या अभिष्टचिंतनाचे फलक शहरात जागोजागी लावण्यात आले असून ते तात्काळ हटविण्याचे आदेश पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, बीट अधिका-यांना दिलेल्या आदेशात पाटील यांनी म्हटले आहे की, आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर आणि पोस्टर्सचा पूर आला आहे. संपूर्ण शहरात बॅनर आणि पोस्टर लावू शकत नाही. नियम सर्वांसाठी समान असला पाहिजे. मोठमोठे होर्डिंग्ज सोडून रस्त्यावर आणि फूटपाथवर असलेले बॅनर आणि पोस्टर्स काढून टाकावेत.
अगोदर फलक लावणा-याला फलक काढून टाकण्यास सांगावे. जर, त्यांनी पुढील सहा तासांत फलक काढले नाही. तर, कृपया महापालिकेने ते काढून टाकावेत. काढताना बॅनर फाडू नका, व्यवस्थित, सावधानतेने काढावा. संपूर्ण शहरात हे काम करावे. फुटपाथवरील फलक काढण्यासाठी संबंधिताला अगोदर संधी द्यावी आणि सक्त ताकीदही द्यावी.तरीही फलक काढला नाही. तर, पालिकेने तो काढावा, अशा सूचना आयुक्त पाटील यांनी दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा