शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. ही घटना घडली त्यावेळी ते कार्यालयात उपस्थित होते. मंगळवारी दुपारी एका दुचाकीवरून जगताप यांच्या कार्यालयाजवळ तिघेजण आले. त्यांनी आपल्यावळील दोन पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या दिशेने फेकले.
त्यानंतर ते दुचाकीवरून पळून गेले. त्यापैकी एक पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीजवळ पडला. सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा