खेड :सहकार क्षेत्रात शिवसैनिकांनी पुढे येण्याची गरज असून गावातील सोसायटीचे सदस्य व चेअरमन बनून जिल्हातील सहकार क्षेत्रात दबदबा निर्माण करावा असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी खेड येथील पक्षाच्या मेळाव्यात केले. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद या सर्वच स्तरात जिल्यातील शिवसैनिकांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. याचं पध्दतीने सहकार क्षेत्रात विविध कार्यकारी सोसायटी ते जिल्हा बँकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
शिवसेनेच्या लिस्ट मधून बाहेर गेला तो माझ्याही लिस्ट मधून बाहेर पडला. जे गेलेत ते पैशासाठी आणि त्यांची चर्चा सुद्धा करू नका, असा टोला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला. शहरातील वैश्य भवन सभागृहात रविवारी शिवसेना कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ना. सामंत म्हणाले की, आपल्या कौटुंबिक अडचणी असून देखील घर बाजूला ठेवून पक्षाचा विचार करणारा एक तरुण, तडफदार आमदार योगेश कदम यांच्या रूपाने तुम्हाला लाभला आहे. मतदारसंघात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित करण्यासाठी धडपडणाऱ्या या नेत्याला पुढे नेण्याची धडपड सर्व कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व सदस्य शिवसेनेचे असावेत, अशी धडपड असणारा शिवसैनिक आमदार तुम्हाला लाभला आहे. त्यांची या मतदारसंघात सुरू असलेली धडपड
आणि ज्यांच्यावर पक्षप्रमुख प्रेम करतात त्यांच्या मतदारसंघात पक्ष संघटना कुठे कमी पडेल असे मला वाटत नाही, असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला.
क्रिकेट मालिकेची फायनल सुरू असताना देखील ज्या मोठ्या संख्येने तालुक्यातील तरुणवर्ग या मेळाव्यासाठी उपस्थित आहे ते पाहून आ.कदम हेच यापुढे सर्व निवडणुकीत कप जिंकतील, असे ना. सामंत यांनी सांगितले. तर जिल्यात सर्व शिवसैनिक एकत्रित राजकीय क्रिकेट खेळले तर विरोधकांची दांडी गुल होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदार योगेश कदम, उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर, तालुका प्रमुख विजय जाधव, सभापती मानसी जगदाळे, जीवन आंबरे, भगवान घाडगे, माधवी बुटाला, अपर्णा नक्षे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसैनिकांनी सहकार क्षेत्रात दबदबा निर्माण करावा- ना. उदय सामंत
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२१ ०२:४९:०० AM
Rating:
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: