पिंपरी : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू, शंकर जगताप यांच्या कार्यालयावर मंगळवारी दुपारी पेट्रोल बॉम्ब फेकणारे तिघे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
राहुल राम साळुंके (वय ३९, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०८, ४३६, ५११, ३३६, ३४, ज्वालाग्राही पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ३, ४, ५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. पिंपळे सौदागर येथे त्यांचे चंद्ररंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्स हे कार्यालय आहे. काल मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीवरून तिघेजण आले. त्यातील दोघांनी कार्यालयावर ज्वलनशील पदार्थ भरलेल्या दोन बाटल्या फेकून मारल्या. मात्र, एक बॉम्ब कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीवर पडला. तर दुसरा रस्त्यावर पडला आहे. सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. शंकर जगताप आणि त्यांच्या कार्यालयात काम करणारा स्टाफ यावेळी कार्यालयात हजर होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात केली होती. तीन आरोपींपैकी दोघांना पिंपरी चिंचवड शहरातून तर एकाला शहराच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आले आहे.
उद्योजक शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकणारे पोलिसांच्या ताब्यात
Reviewed by ANN news network
on
११/२४/२०२१ ०९:५०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/२४/२०२१ ०९:५०:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: