आळंदी : माउली मंदिरास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सदिच्छा भेट देवून माउलींचे दर्शन घेत पूजा केली. यावेळी आळंदी देवस्थांनचे वतीने प्रमुख विश्वस्त योगेश देसाई,विश्वस्त अॅड विकास ढगे पाटील तसेच आळंदी नागर्परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यपाल कोश्यारी यांचे हस्ते श्रींचा ७२५ वा संजीवन समाधी महोत्सवी वर्ष या निमित्त लोगो चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्रींची मूर्ती, पसायदान प्रतिमा, तुळशीहार, शाल, श्रीफळ देवून राज्यपाल कोश्यारी यांना सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण, तहसिलदार वैशाली वाघमारे,आळंदीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, मंडलधिकारी स्मिता जोशी, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, सेवक बाळासाहेब रनदिवे, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, व्यवस्थापक माऊली वीर, श्रीधर सरनाईक, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे आदि उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आळंदीस सदिच्छा भेट
Reviewed by ANN news network
on
११/२९/२०२१ ११:२४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: