पिंपरी : इंद्रायणी नदीस्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेली भारतातील सर्वात मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीच्या साक्षीने यशस्वी पार पडली.
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी काम करणार्या अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पर्यावरण प्रेमी संस्था आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने रविवारी, सकाळी 6 वाजता या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, अविरत श्रमदान संस्थेचे संस्थापक सदस्य डॉ. निलेश लोंढे, भाजपा प्रवक्ते अमोल थोरात, सरचिटणीस विजय फुगे आदी उपस्थित होते.
अशी झाली सायक्लोथॉन!
रिव्हर सायक्लोथॉन तीन टप्प्यांमध्ये अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने झाली. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 किमी मार्यादा होती. अंकुशराव लांडगे सभागृह- जय गणेश साम्राज्य- अंकुशराव लांडगे सभागृह असा मार्ग होता. दुसरा टप्पा 15 किमी अंतराचा अंकुशराव लांडगे सभागृह- जय गणेश साम्राज्य क्रांती चौक- जय गणेश साम्राज्य- अंकुशराव लांडगे सभागृह असा पूर्ण करण्यात आला. तसेच, 25 किमी अंतराच्या सायक्लोथॉनसाठी अंकुशराव लांडगे सभागृह- स्पाईन रोड- क्रांती चौक साने चौक, कृष्णानगर- अंकुशराव लांडगे सभागृह असा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.
चौकट
गावजत्रा मैदानावर सायकलपटूंचा महासागर : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेली भारतातील सर्वांत मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ पाहून अभिमान वाटतो. भोसरीच्या गावजत्रा मैदानावर जमलेला सायकलपटूंचा हा सागर नाही, तर महासागर आहे, अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपक्रमाचे कौतूक केले.
‘रिव्हर सायक्लोथॉन’द्वारे इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती
Reviewed by ANN news network
on
११/२८/२०२१ ०२:४०:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: