महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शहरातील भाजपचे कारभारी आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
कामठे यांनी पाटील आणि फडणवीस यांना पत्र पाठवले असून आमदार लांडगे आणि जगताप यांनी मागील 5 वर्षात अनेक चुकीची कामे केली असल्याने येत्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली आहे.
महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर हे दोन्ही आमदार आपण जे गैरव्यवहार केले त्याचे खापर नगरसेवकांच्या डोक्यावर फोडतील, अशी शक्यताही कामठे यांनी पत्रात वर्तवली आहे. या दोघांच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराला नगरसेवक त्रासले आहेत असा आरोपही कामठे यांनी पत्रात केला आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देताना लांडगे किंवा जगताप गट असा विचार न करता सर्वसामान्य व मेहनती कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी या पत्राद्वारे कामठे यांनी केली आहे.
आमदार लांडगे, जगताप यांची शहरात मनमानी : तुषार कामठे
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२१ १२:३०:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: