महापालिका पिंपरीतील जिजामाता रुग्णालयावर निविदा न काढताच 36 लाखांचा खर्च करणार

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने पिंपरी येथे बांधलेल्या जिजामाता रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यासाठी निविदा न काढता थेट पद्धतीने 36 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. स्थायीसमितीच्या बैठकीसमोर ठेवण्यात आला आहे. 

महापालिकेच्या वतीने शहरामध्ये भोसरी, आकुर्डी, थेरगाव व पिंपरीतील जिजामाता रुग्णालय नव्याने सुरू करण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, शस्त्रक्रिया विभाग सुरू नसल्याने शस्त्रक्रिया करता येत नाहीत. त्यामुळे याठिकाणी तातडीने शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे.

३१ डिसेंबर २०२१ पूर्वी जिजामाता रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात येणार आहे. कक्ष सुरू करण्यासाठी शस्त्रक्रिया विभागामधील वातानुकुलन यंत्रणेसाठी आवश्यक असलेले एस.एस.प्लेनम, डक्टीग, ग्रील हे कामकाज पूर्ण होणे आवश्यक आहे. त्याशिवाय शस्त्रक्रिया विभाग सुरू करणे शक्य नाही. डिसेंबर अखेर पूर्ण करायचे असल्याने त्यासाठी अवघा दीड महिन्याचा कालावधी बाकी राहिला आहे. या कालावधीमध्ये निविदा काढून काम पूर्ण करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काम थेट पद्धतीने देण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया विभागामधील वातानुकुलन यंत्रणेचे काम करण्यासाठी अंदाजे १६ लाख २० हजार रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे मूळ कामाच्या निविदा रक्कमेमध्ये ही रक्कम वाढविण्यात येणार आहे. या वाढीव खर्चास २५ ऑक्टोबर २०२१ रोजी आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार मेसर्स कमल ईलेक्ट्रीक एंटरप्रायजेस यांच्याकडून काम करून घेण्यात येणार आहे.

महापालिका पिंपरीतील जिजामाता रुग्णालयावर निविदा न काढताच 36 लाखांचा खर्च करणार महापालिका पिंपरीतील जिजामाता रुग्णालयावर निविदा न काढताच 36 लाखांचा खर्च करणार Reviewed by ANN news network on ११/१६/२०२१ ०६:५४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".