पुणे : शहरातील बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका हॉटेलवर दि. ०८ जुलै २०२५ रोजी छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे, श्रीराम यशदा बिल्डींग, पहिला मजला, ऑफीस नं. ०२, बालेवाडी फाटा, बाणेर, पुणे येथील एका स्पा सेंटरवर वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे छापा टाकला असता, सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय चालू असल्याचे आढळून आले.
या छाप्यात स्पा मॅनेजर अब्बास अब्दुल मतीन हुसेन (वय-२१ वर्षे, रा. ममतानगर कॉलनी नं. ०१, सांगवी, पुणे, मूळ रा. ग्राम कांदुलिमारे, थाना- जमनामुग, जि. हुजय, राज्य- आसाम) आणि इतर तीन पाहिजे आरोपींनी दोन पीडित महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्राप्त करून घेतले होते. त्यांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आले होते आणि स्पाच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेण्यात येत होता. तसेच, भाडेकरूबाबत जवळच्या पोलीस स्टेशनला कोणतीही माहिती न देता, स्वतःची मालकीची जागा वेश्याव्यवसायासाठी उपलब्ध करून देऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिविका भागवत असताना ते आढळून आले.
याप्रकरणी सरकारतर्फे सदर इसमांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, आणि बी.एन.एस. कलम १४३, २२३, ३ (५) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
ही कामगिरी बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, चंद्रशेखर सावंत, सपोनि झरेकर, थिटे, कदम, अंमलदार योगिता मिसाळ, क्षिरसागर, वणवे, भोरे, खुडे, बर्गे यांनी केली.
Crime, Prostitution, Police Raid, Pune
#PunePolice #ProstitutionRaid #Baner #CrimeNews #HumanTrafficking #PoliceAction #SpaRaid

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: