पुणे: वाहनचोरी विरोधी पथक १ ची मोठी कारवाई; चोरीला गेलेली ऑटो रिक्षा हस्तगत, आरोपी जेरबंद

 


 पुणे, १२ जुलै २०२५: पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा वाहनचोरी विरोधी पथक ने ११ जुलै २०२५ रोजी वाहनचोरी प्रतिबंधक मोहीम राबवून फरासखाना पोलीस स्टेशन, गु..नं. १३९/२०२५, भा.न्या.सं..  ३०३() या गुन्ह्याचा समांतर तपास करत, चोरीला गेलेली ४०,०००/- रुपये किमतीची एक तीनचाकी ऑटो रिक्षा हस्तगत केली आणि आरोपी सूरज बाबूराम पांडे (वय ३५ वर्षे, मूळगाव पाठककापुर्वा, पो. अंधियारी, ता. कुंडा, जि. प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश, सध्या रा. पुणे - फिरस्ता) याला जेरबंद केले.  

दरोडा वाहनचोरी विरोधी पथक मधील पोलीस अधिकारी अंमलदार हे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना,  अंमलदार प्रदीप राठोड शिवाजी सातपुते यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची माहिती काढली.  त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, सदर आरोपी संगमवाडी पार्किंगजवळील स्मशानभूमीजवळ चोरीस गेलेल्या ऑटो रिक्षासह उभा आहे.  

या माहितीच्या आधारे, उपरोक्त अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचला आणि आरोपी सूरज बाबूराम पांडे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने दाखल गुन्ह्याची कबुली दिली.  यामुळे फरासखाना पोलीस स्टेशनकडील वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला.  

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षकसंदीप भोसले, सहाय्यक निरीक्षक प्रविण काळुखे, वर्षा कावडे तसेच  अंमलदार प्रदीप राठोड, गणेश ढगे, शिवाजी सातपुते, अजित शिंदे, धनंजय ताजणे, बाळु गायकवाड, निनाद माने, दत्तात्रय पवार, महेश पाटील, साईकुमार कारके, अमित गद्रे, नारायण बनकर यांनी केली.  

Vehicle Theft, Auto Rickshaw, Pune Police, Crime Solved, Anti-Dacoity Squad 

#PunePolice #VehicleTheft #CrimeSolved #AutoRickshaw #PoliceAction


पुणे: वाहनचोरी विरोधी पथक १ ची मोठी कारवाई; चोरीला गेलेली ऑटो रिक्षा हस्तगत, आरोपी जेरबंद पुणे: वाहनचोरी विरोधी पथक १ ची मोठी कारवाई; चोरीला गेलेली ऑटो रिक्षा हस्तगत, आरोपी जेरबंद Reviewed by ANN news network on ७/१३/२०२५ ०१:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".