पुणे, दि.
१७ जुलै - पुणे
शहर पोलीस आयुक्त
श्री. अमितेश कुमार
यांनी फरासखाना पोलीस
स्टेशन हद्दीतील 'रेड
अलर्ट एरिया' मध्ये
अंमली पदार्थ विक्री
आणि सेवन करणाऱ्यांवर कठोर
कारवाई करण्याचे आदेश
दिले होते. या आदेशानुसार, फरासखाना पोलीस
स्टेशनने तपास पथकातील अधिकारी व
कर्मचाऱ्यांसह
पेट्रोलिंग सुरू केले.
दि.
१६ जुलै
२०२५ रोजी, पोलीस
अंमलदार नितीन तेलंगे आणि
गजानन सोनुने यांना
गोपनीय माहिती मिळाली
की, बँगलोर, कर्नाटक येथील
एक इसम १७
जुलै २०२५ रोजी
'रेड अलर्ट एरिया'
मधील कॅसेट गल्ली
येथे अंमली पदार्थ
'याबा' गोळ्या विक्रीसाठी येणार
आहे.
या
माहितीच्या आधारे, फरासखाना पोलीस
स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. प्रशांत भस्मे
यांनी पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक
पथक तयार करून
छापा कारवाईची योजना
आखली. १७ जुलै
२०२५ रोजी पथकाने
यशस्वीपणे सापळा रचून अंमली
पदार्थ 'याबा' गोळी
विक्रीसाठी घेऊन आलेल्या निशान
हबीब मंडल (वय
४७, रा. बँगलोर,
कर्नाटक) याला ताब्यात घेतले.
त्याच्या अंगझडतीदरम्यान ७५.३६ ग्रॅम वजनाच्या ७१८
नग 'याबा' नावाच्या गोळ्या,
गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मोपेड गाडी,
चार मोबाईल फोन
आणि रोख रक्कम
असा एकूण ६
लाख ५८ हजार
८६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला. आरोपीविरोधात फरासखाना पोलीस
स्टेशनमध्ये गु.र.नं.
१४४/२०२५ एन.डी.पी.एस.
अॅक्ट कलम
८ (क), २२
(क) अन्वये गुन्हा
दाखल करून त्याला
अटक करण्यात आली
आहे.
ही
कारवाई वरिष्ठ निरीक्षक, फरासखाना पोलीस
स्टेशन प्रशांत भस्मे,
निरीक्षक (गुन्हे)
अजित जाधव,
सनि शितल जाधव,
उपनिरीक्षक अरविंद
शिंदे आणि इतरअंमलदार यांनी केली.
Drug Seizure, Narcotics, Arrest, Pune Police, Faraskhana, Yaba
#PunePolice #DrugSeizure #Yaba #Narcotics #Faraskhana
#CrimeNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: