वारजे माळवाडी पोलिसांकडून दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकाला अटक; ५.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 


पुणे  - पुणे शहरातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने दिनांक १७ जुलै २०२५ रोजी रात्री "ऑल आऊट कोंबिंग ऑपरेशन" मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत वारजे माळवाडी पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून ५ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईसाठी दिनांक १७ जुलै २०२५ रोजी  निरीक्षक (गुन्हे)   प्रकाश धेंडे आणि  निलेश बडाख यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनकडील एक पथक तयार केले. या पथकाला रेकॉर्डवरील आरोपी आणि संशयास्पद फिरणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनांनुसार कारवाई करण्यासाठी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनकडील रात्रगस्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उप-निरीक्षक सिध्देश्वर रायगोंडा आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार शेलार व त्यांच्या पथकाने गस्त घालण्यास सुरुवात केली.

रात्रीच्या वेळी हद्दीत गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार शेलार यांना गोपनिय बातमी मिळाली की, जुना जकात नाका, वारजे माळवाडी येथील एम.टी.डी.सी. गेस्ट हाऊस जवळ काही इसम बोलेरो गाडीमध्ये थांबले असून, ते दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. बातमीची खात्री पटल्यानंतर पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचला. यावेळी गाडीत बसलेल्या एका इसमास पोलिसांनी शिताफीने पकडले.

त्याला नाव व पत्ता विचारला असता, त्याने आपले नाव सोनू कपूसिंग टाक (वय २९ वर्षे, रा. तुळजा भवानी वसाहत, बंटर शाळेमागे, गाडीतळ, हडपसर, पुणे) असे सांगितले. आरोपी सोनू टाक यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे २,५०,०००/- रुपये किमतीची एक बोलेरो गाडी, ३,२५,०००/- रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि १०,०००/- रुपये किमतीचे घरफोडीचे साहित्य व प्राणघातक हत्यारे असा एकूण ५,८५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेली बोलेरो गाडी हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४०५/२०२५ मधील चोरीची असावी असा संशय आहे. पोलीस अंमलदार शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सोनू कपूसिंग टाक आणि त्याचे गुन्ह्यातील इतर साथीदार यांच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३०२/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १११, ३९०(८), ३९०(४), ३९०(५), आर्म अॅक्ट ८(२४), मपोका कलम ३०(९)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी  निरीक्षक (गुन्हे)  प्रकाश धेंडे व श्री. निलेश बडाख, रात्रगस्त अधिकारी सहाय्यक  निरीक्षक सचिन पाटील,  उपनिरीक्षक सिध्देश्वर रायगोंडा तसेच  अंमलदार शेलार, अशोक काटे, प्रविण भोसले, किरण जाधव, प्रदीप शेलार, श्री. नवनाथ कांबळे, तुषार दळवी, अतुल लीमन, वैभव भोसले यांनी पार पाडली.

Robbery Attempt, Arrest, Pune Police, Warje Malwadi, Crime, Stolen Property  

 #PuneCrime #RobberyFoiled #WarjeMalwadiPolice #PoliceAction #CrimePrevention #PuneNews

वारजे माळवाडी पोलिसांकडून दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकाला अटक; ५.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त वारजे माळवाडी पोलिसांकडून दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकाला अटक; ५.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त Reviewed by ANN news network on ७/१८/२०२५ ०२:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".