पुण्यात अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस जप्त

 


पुणे :  शहरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत, दि. ०९/०७/२०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने एका अल्पवयीन मुलाकडून अवैध गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत राऊंड जप्त केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि पोलीस स्टाफ हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, आणि सागर बोरगे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फतीने माहिती मिळाली की, नॅन्सी लेक होम सोसायटीकडून लेकटाऊनकडे एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेऊन जात आहे.

या माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि नमूद अंमलदारांनी नॅन्सी लेक होमकडून लेकटाऊनकडे जाणाऱ्या रोडवर शोध घेतला असता, स्व. शंकरराव राजाराम कदम स्वीमिंग टँक समोरील रोडवर एक विधीसंघर्षित बालक (अल्पवयीन) ५०,०००/- रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस, असा एकूण ५०,५००/- रुपयांचा मुद्देमाल घेऊन आढळून आला. दि. ०९/०७/२०२५ रोजी हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर ३२९/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपीचा शोध चालू आहे.

ही कामगिरी अपर आयुक्त, राजेश बनसोडे,  उप आयुक्त मिलींद मोहीते,सहा.आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे,  निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, तपास पथकाचे उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली.

Crime, Pune Police, Illegal Weapons 

#PunePolice #IllegalWeapons #CrimeNews #BhartiVidyapeeth #PistolSeized #PuneCrime #LawEnforcement


पुण्यात अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस जप्त पुण्यात अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस जप्त Reviewed by ANN news network on ७/१०/२०२५ ०६:२३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".