आंबेगावमध्ये ४० लाखांची जबरी चोरी; २४ तासांत आरोपी जेरबंद

 


 आंबेगाव दरोडा प्रकरण: फिर्यादीचा मित्रच निघाला मुख्य सूत्रधार  

 पुणे, दि.  १७ जुलै - येडशी, धाराशिव येथील पत्रा स्टीलचे साहित्य पुरवणारे व्यावसायिक पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून पैसे घेण्यासाठी आले असताना, आंबेगाव परिसरात त्यांच्यासोबत असलेल्या ४० लाख रुपये रोख रकमेची बॅग जबरी चोरीला गेली होती.  ही घटना १५ जुलै २०२५ रोजी घडली होती.  या प्रकरणी आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

 घटनेनंतर अवघ्या २४ तासांत पुणे शहर गुन्हे शाखा, युनिट- आणि आंबेगाव पोलिसांनी तपास करून आरोपींना जेरबंद केले आहे.  तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेज  आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा थार गाडी (एमएच १२ डब्लुई ००८५) निष्पन्न झाली.  पोलिसांनी प्रदिप रामदास डोईफोडे (वय ३५, रा. भुगाव, पुणे)  आणि मंगेश दिलीप ढोणे (वय ३२, रा. येडशी, धाराशिव)  या दोन आरोपींसह एका विधीसंघर्षित बालकाला खंडोबा मंदिर रोड, भुगाव, पुणे येथून ताब्यात घेतले.  

 आरोपींकडून पाच मोबाईल हॅन्डसेट  , लाख ३५ हजार ५०० रुपये रोख रक्कम  , एक काळ्या रंगाची थार गाडी  , तसेच गाडीमध्ये एमएच १२ डब्लुई ००८५ क्रमांकाच्या काढून ठेवलेल्या चार नंबर प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत.  गुन्ह्यातील अटक आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीत फिर्यादीचा मित्रच यातील आरोपींना बातमी देऊन त्यांच्यासोबत संगनमताने गुन्ह्यात सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे.  

ही कामगिरी  निरीक्षक विजय कुंभार, वरिष्ठ  निरीक्षक अंजुम बागवान, शरद झिने, निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, सहा. निरीक्षक अमोल रसाळ, आशिष कवठेकर, उप निरीक्षक मोहन कळमकर आणि इतर  अंमलदार यांनी केली आहे.  

 Robbery, Arrest, Pune Crime, Extortion, Conspiracy  

 #PuneCrime #Robbery #Ambegaon #PoliceAction #Conspiracy #CrimeNews



आंबेगावमध्ये ४० लाखांची जबरी चोरी; २४ तासांत आरोपी जेरबंद आंबेगावमध्ये ४० लाखांची जबरी चोरी; २४ तासांत आरोपी जेरबंद Reviewed by ANN news network on ७/१७/२०२५ ०८:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".